श्रीरामपूर ता.देवळा जि. नाशिक
gpshrirampur@gmail.com
सुचना :
श्रीरामपूर (वाखारवाडी) हे महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यात देवळा तालुक्यातील एक प्रगतशील व ऐतिहासिक गाव आहे. २०११ च्या जनगणनेनुसार या गावाची लोकसंख्या सुमारे १५४२ आहे. गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा 3, अंगणवाडी केंद्र 3 अशी शैक्षणिक सुविधा उपलब्ध आहेत. तसेच दत्त मंदिर ,राम मंदिर व हनुमान मंदिर हे प्रसिद्ध देवस्थान आहे. सामुदायिक सभामंडप, पाणीसाठवण,जलशुद्धीकरण प्रकल्प सार्वजनिक विहिरी व शेततळी अशा सामाजिक व धार्मिक सुविधा देखील आहेत.
गावातील बहुतांश लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असून अधिकतर कांदा, गहू मका व भाजीपाला ही प्रमुख पिके घेतली जातात. कांदा व मका या पिकांच्या लागवडीमुळे गावातील शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते.
श्रीरामपूर ग्रामपंचायतीत विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबविल्या गेल्या आहेत. घरकुल योजना अंतर्गत गरजू लाभार्थींना घरांना लाभ मिळाला आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत श्रीरामपूर गावाने संपूर्ण खुले शौचमुक्त (ODF+) दर्जा मिळवला आहे. जलसंधारण व पाणीपुरवठा योजना अंतर्गत गावात पाणीपुरवठा नियमित करण्यात आला आहे. गावाला हक्कची विहीर मिळाली.तसेच शाळा व अंगणवाडी डिजिटल करण्यात आले आहेत.तसेच मुख्यमंत्री सुदंर शाळा मध्ये तालुकास्तरावर बक्षीस मिळाले आहे.
ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचारी मिळून गावाचा सर्वांगीण विकास घडवून आणतात. ग्रामपंचायतीचे निर्णय लोकसहभागातून घेतले जातात.
आज श्रीरामपूर हे गाव आदर्श व विकासीत गावकडे वाटचाल करीत आहे.
🌾 ग्रामपंचायत क्षेत्रफळ
हेक्टर
🏢 वार्ड संख्या
३
👥 पुरुष संख्या
९९४
👥 स्त्री संख्या
८८४
👥 कुटुंब संख्या
३७४
👥 एकूण लोकसंख्या
१८७८
श्रीरामपूर हे गाव कृषीप्रधान आणि पारंपरिक जीवनशैलीसाठी ओळखले जाते. शेती हा गावकऱ्यांचा मुख्य व्यवसाय असून कांदा, बाजरी, मका आणि विविध हंगामी भाजीपाला यांची लागवड येथे मोठ्या प्रमाणावर केली जाते. शेतीव्यतिरिक्त काही लोक दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन तसेच लघुउद्योग या क्षेत्रांतही कार्यरत आहेत.
गावात सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक परंपरा दृढपणे जपल्या जातात. वर्षभर साजरे होणारे सण-उत्सव, ग्रामदैवतांची पूजाअर्चा हे गावाच्या एकात्मतेचे प्रतीक मानले जाते. आदिवासी परंपरा आणि संस्कृतीही येथे तितक्याच जपल्या जातात. गणेशोत्सव, होळी, दिवाळी, नवरात्र दत्त जयंती,रामनवमी यांसह स्थानिक देवतांच्या जयंतीना विशेष महत्त्व आहे.
येथील लोक मेहनती, मदत करणारे या मूल्यांना आचरणात आणणारे आहेत. लोकसहभागातून काम ग्रामविकासात महिलांचा सहभाग स्वयंसाहाय्य गटांमुळे प्रकर्षाने जाणवतो. तरुण पिढी शिक्षण, खेळ व रोजगाराच्या संधी शोधून प्रगतीकडे वाटचाल करत आहे.
श्रीरामपूरच्या लोकजीवनात पारंपरिक ग्रामीण व आदिवासी संस्कृतीसोबतच आधुनिकतेचा स्पर्शही आढळतो, ज्यामुळे गाव विकास आणि एकतेचा उत्तम संगम घडवते.
ग्रामदैवताचे मंदिर – श्रीरामपूर ही गावातील ग्रामदैवते असून त्यांची मंदिरे गावकऱ्यांची अखंड श्रद्धास्थाने आहेत. येथे दरवर्षी साप्ताह, व इतर धार्मिक कार्यक्रम उत्साहात साजरे केले जातात तसेच दर रामनवमीला रामजन्म उत्सव उस्ताहात व भजन कीर्तनाने कार्यक्रम होतो..
हनुमान मंदिर – गावाच्या मध्यवर्ती भागात वसलेली ही मंदिरे सण-उत्सवांच्या काळात ग्रामस्थांच्या एकत्र येण्याचे व संवाद साधण्याचे केंद्रस्थान ठरतात.
कर्ला धरण – गावाजवळ असलेले कर्ल्रा धरण हे संपूर्ण परिसरात झाडे हिरवागार झालेला परिसर आहे ते दृश्य पाहण्यास खूप छान वाटते. एका पर्यटनस्थळला मागे टाकतील इतके सुंदर व विभोनीय आहे.
दत्त मंदिर - दत्तमंदिर हे वाखारीरस्ताला लागून आहे. हे गावातील लोकाचे श्रद्धास्थान आहे. दत्त जयंतीला येथे कीर्तन व भंडाराचा कार्यक्रम होतो.
शेती क्षेत्र – श्रीरामपूर कांदा , डाळिंब भाजीपाला मका उत्पादनासाठी प्रसिद्ध असून येथे पसरलेली हिरवीगार शेती पाहण्यासारखी आहे. शेती हा ग्रामजीवनाचा मुख्य आधार आहे.
जलसंधारण प्रकल्प – गावात पाणलोट क्षेत्र विकास व जलसंधारणाच्या उत्तम उपाययोजनांमुळे परिसराचे नैसर्गिक सौंदर्य अधिक खुलून दिसते. मनरेगा (MREGS) व अटल भूजल योजनेअंतर्गत मातीतळे, गावतळे, शेततळे उभारण्यात आले आहेत. यामुळे शेतीला तसेच गावकऱ्यांना मोठा फायदा झाला आहे. या कामगिरीबद्दल गावाचा वेळोवेळी सन्मान करण्यात येतो..
मा.श्री. ओमकार पवार (IAS)
(जि.प.नाशिक)
मा.श्रीमती. वर्षा फडोळ -- बेडसे
(जि.प.नाशिक)
मा.श्री.प्रशांत पवार
(पंचायत समिती देवळा)
मा.श्री.सी.एम.थोरात
(पंचायत समिती देवळा)
मा. श्री. देवीप्रसाद मांडवडे
(पंचायत समिती देवळा)
श्रीमती लीलाबाई भिवसन पवार
श्री.प्रशांत त्र्यंबक निकम
श्री.संभाजी रामभाऊ देवरे
श्री.जगदीश अभिमन निकम
(सदस्य)
श्री. लाला धर्मा पवार
(सदस्य)
श्री साहेबराव लाला पवार .
(सदस्य)
श्रीमती वंदना साहेबराव निकम (सदस्य)
श्रीमती वैशाली किशोर सावंत (सदस्य)
श्रीमती शोभा दिपक पवार
(सदस्य)
श्रीमती अर्चना रवींद्र पवार (सदस्य)
श्रीमती . संगीता साहेबराव पवार (सदस्य)
श्रीमती .शितल हेमंत निकम
श्री.योगेश निकम
श्री.बळीराम जयराम निकम
श्री.किरण देविदास बच्छाव
श्री. डी.टी.अहिरे (ग्राम महसूल अधिकारी)
श्रीमती.अश्विनी थोरात (BLO)
श्री.जयवंत मधुकर निकम (पोलीस पाटील)
श्री.निलेश अशोक जगताप (सहाय्यक कृषी अधिकारी)